![]() |
In Pencil Shading |
![]() |
In Water Colour |
आमच्या संस्कारभारतीच्या ग्रुप च्या निमित्ताने ह्या रविवारी आउट डोअर साठी ठाण्यातील रेती बंदर हा स्पॉट निवडला होता. मी कधी गेलो नव्हतो पण मीरा-रोड साईडला जाताना एक दोनदा बस मधून बघितला होता.
सकाळी बरोबर ९.०० वाजता स्पॉट वर पोहचलो, मी गेलो तेव्हा स्पॉटवर कोणीच नव्हत. स्पॉट वर पहिल्यांदाच गेलो असल्या मुळे पूर्ण स्पॉट आधी पाहून घेतला.कारण आउट डोअरला काम करत असताना पेंटिंग किंवा स्केचिंगसाठी नक्की काय निवडायच हि भरपूर महत्वाची गोष्ट असते,कारण समोर पुष्कळश्या गोष्टी असतात. पण त्यातली अगधी नेमकी व पेंटिंगसाठी सोपी आणि सोयीचे ठिकाण शोधणे अगधी महत्वाचे असते. कारण हे रेती बंदर असल्या मुळे सावलीचा प्रश्न येतच नाही आणि शांतता तर मुळीच नाही कारण खाडी मधून रेती काढणाऱ्या क्रेन चा होणारा आवाज हा सुंदरशी अशी बॅगराउंड म्युसिक देत होता आणि वरून सूर्य आग ओकत होता. मन अशा परिस्थितीत शांतता आणि सावली अशक्यच. त्यातल्या त्यात मी एका बंद क्रेन च्या आडोश्याला बसून आणि काना मध्ये हेडफोन घालून काढलेले हे सुंदर बोटीचे चित्र
2 comments:
चांगला प्रयत्न आहे...
good keep it up
कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद
Post a Comment