24 November 2011

Face Study




त्यादिवशी कॉलेज मध्ये असच टाईम पास करत असताना माझ्याच एका मैत्रीणीने माझी स्केच बुक बघायला मागितली आणि स्केचेस बघून चक्क तिने मला, अरे माझे पण एकाधे असे स्केच काढ ना. अशी विनंती केली. मग काय मी पण कोणता हि विचार न करता हो म्हणालो. हो तर म्हणालो होतो पण ह्या पूर्वी अस कोणाला स्केच काढून दीले नव्हते. तशी मित्रांची, घरातल्यांची इतकेच नव्हे तर सरांचे देखील स्केच काढले होते पण कधी त्यांना भेट म्हणून दिली नव्हती. ती मी माझ्या मनाने आणि त्यांच्या नकळत च काढायचो. एकधा मला आठवतंय की मी फोटो मध्ये बघून माधुरी दीक्षित च स्केच केलेल पण तो प्रयोग माझा फसलेला त्यामुळे हे स्केच करताना बरस टेन्शन होत. कितपत चांगल येतय हा एक प्रश्न होताच. मग विचार केला की, किती दिवस झाले व्यक्ती चित्राचा अभ्यास झाला नाही आहे. ह्या स्केच च्या निमित्ताने तरी ब्लॉग वर टाकायला एक सुंदर चित्र तरी मिळेल. नशीब तिने अगोदरच सांगितलं होत की कसही आल तरी चालेल पण मला तु स्केच काढून दे त्यामुळे का होयीना थोडस मनावरील दडपण तरी कमी झाल.
फोटो वरून स्केच करणे थोडे अवघडच असते असे माझे वयक्तिक मत आहे.कारण आपण जेव्हा मॉडेल बसवून स्केच किंवा पेंटिंग करतो तेव्हा आपल्याला बारकावे आणि शेडलाईट चा चांगला अभ्यास करता येतो आणि त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्रिमितीय (three dimensional) आणि अॅनाटॉमी चा हि बरासा चांगला अभ्यास होतो. त्यामुळे मॉडेल बसवून स्केच किंवा पेंटिंग करणे केव्हाही चांगले.यीथे मला पर्याय नसल्या मुळे मला फोटोवरच काम चालवावे लागले. 

फोटो स्केच च्या काही टिप्स 

  •  फोटो सिलेक्ट करताना असा करा की त्यातील शेड लाईट तुम्हाला नीट दिसतील. 
  • फोटो हा बहुधा दिवसा काढलेला असावा कारण दिवसा पडणाऱ्या छायाप्रकाशामुळे आपणास बरेसे टोन स्केच मध्ये दाखवता येतात. 
  • फोटो ची चांगली प्रिंट खराब करण्या ऐवजी तुम्ही त्याच फोटो ची ग्लॉसी प्रिंट आणि एक black and white प्रिंट काढून घेऊ शकता. हि तुम्हाला एकाध्या प्रिंटर च्या किंवा झेरोक्स च्या दुकानात दहा ते पंधरा रुपया पर्यंत सहज मिळू शकते.
  • फोटो स्केच काढताना ते किती मोठे काढणार आहात हे भरपूर महत्वाचे असते.त्यामुळे तो फोटो आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आधी कट करून घ्यावा.
  • फोटो स्केच किंवा पेंटिंग काढताना फोटो वर स्केल टाकून घेणे म्हणजेच लाईनींग करून घेणे महत्वाचे असते.अगधी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण पुस्तकातून बघून टीपक्यांची रांगोळी काढतोना अगधी त्या प्रकारे. 
  • त्या नंतर आपल्या स्केच पेपर वर योग्यती मापे घेऊन त्याच प्रमाणे लाईनींग करून घेणे आणि मग हळू हळू एकएक ब्लॉक पूर्ण करत जाने हि पद्धत थोडी कठीण आहे पण अगधी कमीत कमी चुकात तुम्ही एक सुंदर आणि हुबेहूब चित्र तयार करू शकता.
  • आणि सरवात शेवटी लाईट टोन कढून डार्क टोन कढे काम करत करत चित्र पूर्ण करावे.
  • व्यक्ती चित्र काढत असताना नेहमी त्यावर किती आणि कुठ पर्यंत काम कराव हे समजत नाही आणि केव्हा केव्हा तर त्या चित्रावर आपण जास्त काम करण्याच्या उदेशाने हळूहळू ते चित्र डॅमेजींग (खराब) ठरू शकत. त्या पेक्षा नव्याने चित्र काढणे किंवा आपली हस्ताक्षर करून चित्राला पूर्ण विराम देणे माझ्या मते योग्य ठरेल.
  • आणि हो बरीशी लोक स्केच किंवा पेंटिंग अगधी हौशीने काढून घेतात पण त्याची जपणूक करायला विसरतात आणि मंग ते एकाध्या पुस्तकामध्ये कुठे तरी ठेवून देतात कृपया असे न करता तेच जर नीट फ्रेमिंग आणि mounting करून ठेवले तर किती चांगले राहते. एवढेच नाही तर ते चित्र साध्या फोल्डर फाईल मध्ये जरी ठेवले तरी ते नीट राहू शकते. शेवटी काय चित्र कितीही चांगले काढले तरी त्याच सादरीकरण देखील तितकच महत्वाच असत.
  • अशा पद्धतीने आपण एकाधे सुंदर स्केच काढू शकता.
तस मी हे स्केच तिला भेट म्हणून दीले आणि सुदैवाने ते तिला आवडले देखिल आणि आमच्या ग्रुप मधून देखील चांगल्या कमेंट मिळाल्या, तेव्हा कुठे स्केच केल्याचे समाधान वाटले आणि आता तुम्हीच बघा आणि ठरवा हे स्केच कितपत बरोबर आहे आणि आपल्या कमेंट द्यायला विसरू नका.     




6 comments:

Shankar Hule said... at November 24, 2011 at 12:29 AM

good one!!!!!!

SHRIKANT VALANJU said... at November 24, 2011 at 12:34 AM

thanks shankar ....

sunil pujari said... at November 24, 2011 at 8:43 PM

good attempt !!!

SHRIKANT VALANJU said... at November 24, 2011 at 11:32 PM

thanks sir for comment

भोवरा said... at December 5, 2011 at 10:09 PM

चांगला प्रयत्न आहे श्रीकांत !!!
पण स्केल टाकून चित्र काढले तर स्वत:ला बंधनात अडकवल्या सारखे वाटते. सुरवातीच्या दिवसात सराव होण्यासाठी म्हणून ठीक आहे. पण नंतर ती सवय सोडून दे. चित्रकाराने किंवा कलाकाराने नेहमी मुक्त राहिले पाहिजे तरच कलेला चांगला न्याय देऊ शकतो.
व्यक्ती चित्रणाचा सराव करायचा असेल तर प्रत्यक्ष माणसांची चित्र काढ...स्केचबुक जवळ ठेवून प्रवासात, कॉलेज मध्ये चित्र काढ.

SHRIKANT VALANJU said... at December 6, 2011 at 10:56 PM

कमेंट दिल्या बद्दल धन्यवाद दादा आणि तु सांगितल्या प्रमाणे नक्कीच प्रयत्न करतो आहे.

Post a Comment

 

माझी ओळख

My Photo
SHRIKANT VALANJU
!! नमस्कार मित्रहो हा एक प्रयत्न आहे माझ्यातला "मी" शोधण्याचा!! माझी ओळख जगाला घडवून देण्यासाठी माझी गुपित मोकळी करण्यासाठी जुन्या विचारांना जिवंत करण्यासाठी मागे वळून पुन्हा एकदा पाहण्यासाठी ........
View my complete profile

तुम्ही माझा हा ब्लॉग पाहिलात का ?

श्रीकांत वळंजू °!!!

आता मी येथे हि

Visit blogadda.com to discover Indian blogs Blog Directory IndiBlogger - The Largest Indian Blogger Community  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सध्या उपस्थित असलेले

माझे पाहुणे

Followers

चित्र संग्रह

सर्व हक्क सुरक्षित

myfreecopyright.com registered & protected

मला मोबाईल वर फॉलो करा..

barcodelink.net