Still Life |
Wood Carving Tools |
This tool are used for above painting |
हे चित्र मी इंटरमीजीएट ला असताना काढलेले आहे .अशा प्रकारे पण एक सुंदर चित्र तयार होऊ शकते हे मला देखील माहिती नव्हते. माझ्या सरांनी मला हि युक्ती सुचवली आणि मग मी बाजारामध्ये पेंटिंग साठी टूल्स शोधत असताना मला ह्या टूल्स ची माहिती मिळाली. खर म्हणजे हे वूड कारविंग टूल्स आहेत आणि ह्याचा वापर लाकडी वस्तून वर कोरीव काम करण्यासाठी केला जातो .पण मी ह्याचा वापर पेंटिंग करण्यासाठी केला आहे .
अशा प्रकार चे एखादे सुंदर चित्र काढण्यासाठी तुम्हाला काही टिप्स.
- प्रथम तुम्हाला जे स्टील लाईफ मांडायचे आहे त्याची आधी छायाप्रकाशाप्रमाणे नीट मांडणी करून घ्या.
- नंतर कोणताही पेंटिंग चा पेपर घ्या शक्यतो तो जरा जाड आणि पांढरा असेल ह्याची काळजी घ्या कारण त्यावर आपले कलर स्ट्रोक नीट बसले पाहिजेत.
- त्या नंतर पेन्सिल ने पेपरावर समोरच्या स्टील लाईफ चे कच्चे रेखाटन करून घ्या जास्त काही बारकावे दाखवत बसण्याची गरज नाही.फक्त आपल्याला वस्तूचा आकार आणि त्यावर पडलेल्या प्रकाशाची नीट मांडणी पेपरावर करायची आहे.जेणे करून आपल्याला रंगकाम करताना कोणताही त्रास होणार नाही.
- चित्राचे रेखाटन करून झाल्यावर चित्र नीट तपासून बघा कारण एकदा रंगकामास सुरवात केली की आपल्याला पेन्सिल चा वापर करता येणार नाही. म्हणून जर चित्र रंगवण्यासाठी तयार असेल तरच रंग कामास सुरवात करा.
- आता तुम्ही कोणत्या माध्यमातून चित्र रंगवणार आहात ते पहिले नक्की करा जसे की पोस्टर कलर, ओईल पेंट, वॉटर कलर इत्यादी.
- आता पॅलेट मध्ये एकाच वेळी जरा जास्त रंग घेऊन बॅगराउंड पासून रंगकामास सुरवात करा.
- बॅगराउंड पूर्ण झाली की नंतर एका एका वस्तू वर काम करत चित्र पूर्ण करा.
- टूल्स ने रंग घेऊन उभे आडवे स्ट्रोक्स देत चित्र पूर्ण करा.
- आणि महत्वाचे म्हणजे हे चित्र मी पोस्टर कलर मध्ये केले आहे.तेव्हा ह्या प्रकारे चित्र काढताना पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे अन्यथा कलर स्ट्रोक्स पेपरावर नीट दिसत नाहीत आणि चित्राची मजा निघून जाते.
- अशा प्रकारे चित्रातले जास्त बारकावे न टिपता अगधी कामाचा आनंद घेत तुम्हाला एक सुंदर चित्र तयार करता येऊ शकते.
आता तुम्हीच ठरवा हे चित्र किती सुंदर आहेते आणि तुम्ही देखील अशा प्रकारे एखादे सुंदर चित्र काढून पहा आणि बघा मग किती मजा येतेती.
0 comments:
Post a Comment