read more "Still Life Part 2"
18 January 2012
01 January 2012
Still Life |
Wood Carving Tools |
This tool are used for above painting |
हे चित्र मी इंटरमीजीएट ला असताना काढलेले आहे .अशा प्रकारे पण एक सुंदर चित्र तयार होऊ शकते हे मला देखील माहिती नव्हते. माझ्या सरांनी मला हि युक्ती सुचवली आणि मग मी बाजारामध्ये पेंटिंग साठी टूल्स शोधत असताना मला ह्या टूल्स ची माहिती मिळाली. खर म्हणजे हे वूड कारविंग टूल्स आहेत आणि ह्याचा वापर लाकडी वस्तून वर कोरीव काम करण्यासाठी केला जातो .पण मी ह्याचा वापर पेंटिंग करण्यासाठी केला आहे .
अशा प्रकार चे एखादे सुंदर चित्र काढण्यासाठी तुम्हाला काही टिप्स.
- प्रथम तुम्हाला जे स्टील लाईफ मांडायचे आहे त्याची आधी छायाप्रकाशाप्रमाणे नीट मांडणी करून घ्या.
- नंतर कोणताही पेंटिंग चा पेपर घ्या शक्यतो तो जरा जाड आणि पांढरा असेल ह्याची काळजी घ्या कारण त्यावर आपले कलर स्ट्रोक नीट बसले पाहिजेत.
- त्या नंतर पेन्सिल ने पेपरावर समोरच्या स्टील लाईफ चे कच्चे रेखाटन करून घ्या जास्त काही बारकावे दाखवत बसण्याची गरज नाही.फक्त आपल्याला वस्तूचा आकार आणि त्यावर पडलेल्या प्रकाशाची नीट मांडणी पेपरावर करायची आहे.जेणे करून आपल्याला रंगकाम करताना कोणताही त्रास होणार नाही.
- चित्राचे रेखाटन करून झाल्यावर चित्र नीट तपासून बघा कारण एकदा रंगकामास सुरवात केली की आपल्याला पेन्सिल चा वापर करता येणार नाही. म्हणून जर चित्र रंगवण्यासाठी तयार असेल तरच रंग कामास सुरवात करा.
- आता तुम्ही कोणत्या माध्यमातून चित्र रंगवणार आहात ते पहिले नक्की करा जसे की पोस्टर कलर, ओईल पेंट, वॉटर कलर इत्यादी.
- आता पॅलेट मध्ये एकाच वेळी जरा जास्त रंग घेऊन बॅगराउंड पासून रंगकामास सुरवात करा.
- बॅगराउंड पूर्ण झाली की नंतर एका एका वस्तू वर काम करत चित्र पूर्ण करा.
- टूल्स ने रंग घेऊन उभे आडवे स्ट्रोक्स देत चित्र पूर्ण करा.
- आणि महत्वाचे म्हणजे हे चित्र मी पोस्टर कलर मध्ये केले आहे.तेव्हा ह्या प्रकारे चित्र काढताना पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे अन्यथा कलर स्ट्रोक्स पेपरावर नीट दिसत नाहीत आणि चित्राची मजा निघून जाते.
- अशा प्रकारे चित्रातले जास्त बारकावे न टिपता अगधी कामाचा आनंद घेत तुम्हाला एक सुंदर चित्र तयार करता येऊ शकते.
आता तुम्हीच ठरवा हे चित्र किती सुंदर आहेते आणि तुम्ही देखील अशा प्रकारे एखादे सुंदर चित्र काढून पहा आणि बघा मग किती मजा येतेती.
24 November 2011
त्यादिवशी कॉलेज मध्ये असच टाईम पास करत असताना माझ्याच एका मैत्रीणीने माझी स्केच बुक बघायला मागितली आणि स्केचेस बघून चक्क तिने मला, अरे माझे पण एकाधे असे स्केच काढ ना. अशी विनंती केली. मग काय मी पण कोणता हि विचार न करता हो म्हणालो. हो तर म्हणालो होतो पण ह्या पूर्वी अस कोणाला स्केच काढून दीले नव्हते. तशी मित्रांची, घरातल्यांची इतकेच नव्हे तर सरांचे देखील स्केच काढले होते पण कधी त्यांना भेट म्हणून दिली नव्हती. ती मी माझ्या मनाने आणि त्यांच्या नकळत च काढायचो. एकधा मला आठवतंय की मी फोटो मध्ये बघून माधुरी दीक्षित च स्केच केलेल पण तो प्रयोग माझा फसलेला त्यामुळे हे स्केच करताना बरस टेन्शन होत. कितपत चांगल येतय हा एक प्रश्न होताच. मग विचार केला की, किती दिवस झाले व्यक्ती चित्राचा अभ्यास झाला नाही आहे. ह्या स्केच च्या निमित्ताने तरी ब्लॉग वर टाकायला एक सुंदर चित्र तरी मिळेल. नशीब तिने अगोदरच सांगितलं होत की कसही आल तरी चालेल पण मला तु स्केच काढून दे त्यामुळे का होयीना थोडस मनावरील दडपण तरी कमी झाल.
फोटो वरून स्केच करणे थोडे अवघडच असते असे माझे वयक्तिक मत आहे.कारण आपण जेव्हा मॉडेल बसवून स्केच किंवा पेंटिंग करतो तेव्हा आपल्याला बारकावे आणि शेडलाईट चा चांगला अभ्यास करता येतो आणि त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्रिमितीय (three dimensional) आणि अॅनाटॉमी चा हि बरासा चांगला अभ्यास होतो. त्यामुळे मॉडेल बसवून स्केच किंवा पेंटिंग करणे केव्हाही चांगले.यीथे मला पर्याय नसल्या मुळे मला फोटोवरच काम चालवावे लागले.
फोटो स्केच च्या काही टिप्स
- फोटो हा बहुधा दिवसा काढलेला असावा कारण दिवसा पडणाऱ्या छायाप्रकाशामुळे आपणास बरेसे टोन स्केच मध्ये दाखवता येतात.
- फोटो ची चांगली प्रिंट खराब करण्या ऐवजी तुम्ही त्याच फोटो ची ग्लॉसी प्रिंट आणि एक black and white प्रिंट काढून घेऊ शकता. हि तुम्हाला एकाध्या प्रिंटर च्या किंवा झेरोक्स च्या दुकानात दहा ते पंधरा रुपया पर्यंत सहज मिळू शकते.
- फोटो स्केच काढताना ते किती मोठे काढणार आहात हे भरपूर महत्वाचे असते.त्यामुळे तो फोटो आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आधी कट करून घ्यावा.
- फोटो स्केच किंवा पेंटिंग काढताना फोटो वर स्केल टाकून घेणे म्हणजेच लाईनींग करून घेणे महत्वाचे असते.अगधी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण पुस्तकातून बघून टीपक्यांची रांगोळी काढतोना अगधी त्या प्रकारे.
- त्या नंतर आपल्या स्केच पेपर वर योग्यती मापे घेऊन त्याच प्रमाणे लाईनींग करून घेणे आणि मग हळू हळू एकएक ब्लॉक पूर्ण करत जाने हि पद्धत थोडी कठीण आहे पण अगधी कमीत कमी चुकात तुम्ही एक सुंदर आणि हुबेहूब चित्र तयार करू शकता.
- आणि सरवात शेवटी लाईट टोन कढून डार्क टोन कढे काम करत करत चित्र पूर्ण करावे.
- व्यक्ती चित्र काढत असताना नेहमी त्यावर किती आणि कुठ पर्यंत काम कराव हे समजत नाही आणि केव्हा केव्हा तर त्या चित्रावर आपण जास्त काम करण्याच्या उदेशाने हळूहळू ते चित्र डॅमेजींग (खराब) ठरू शकत. त्या पेक्षा नव्याने चित्र काढणे किंवा आपली हस्ताक्षर करून चित्राला पूर्ण विराम देणे माझ्या मते योग्य ठरेल.
- आणि हो बरीशी लोक स्केच किंवा पेंटिंग अगधी हौशीने काढून घेतात पण त्याची जपणूक करायला विसरतात आणि मंग ते एकाध्या पुस्तकामध्ये कुठे तरी ठेवून देतात कृपया असे न करता तेच जर नीट फ्रेमिंग आणि mounting करून ठेवले तर किती चांगले राहते. एवढेच नाही तर ते चित्र साध्या फोल्डर फाईल मध्ये जरी ठेवले तरी ते नीट राहू शकते. शेवटी काय चित्र कितीही चांगले काढले तरी त्याच सादरीकरण देखील तितकच महत्वाच असत.
- अशा पद्धतीने आपण एकाधे सुंदर स्केच काढू शकता.
तस मी हे स्केच तिला भेट म्हणून दीले आणि सुदैवाने ते तिला आवडले देखिल आणि आमच्या ग्रुप मधून देखील चांगल्या कमेंट मिळाल्या, तेव्हा कुठे स्केच केल्याचे समाधान वाटले आणि आता तुम्हीच बघा आणि ठरवा हे स्केच कितपत बरोबर आहे आणि आपल्या कमेंट द्यायला विसरू नका.
16 November 2011
In Pencil Shading |
In Water Colour |
आमच्या संस्कारभारतीच्या ग्रुप च्या निमित्ताने ह्या रविवारी आउट डोअर साठी ठाण्यातील रेती बंदर हा स्पॉट निवडला होता. मी कधी गेलो नव्हतो पण मीरा-रोड साईडला जाताना एक दोनदा बस मधून बघितला होता.
सकाळी बरोबर ९.०० वाजता स्पॉट वर पोहचलो, मी गेलो तेव्हा स्पॉटवर कोणीच नव्हत. स्पॉट वर पहिल्यांदाच गेलो असल्या मुळे पूर्ण स्पॉट आधी पाहून घेतला.कारण आउट डोअरला काम करत असताना पेंटिंग किंवा स्केचिंगसाठी नक्की काय निवडायच हि भरपूर महत्वाची गोष्ट असते,कारण समोर पुष्कळश्या गोष्टी असतात. पण त्यातली अगधी नेमकी व पेंटिंगसाठी सोपी आणि सोयीचे ठिकाण शोधणे अगधी महत्वाचे असते. कारण हे रेती बंदर असल्या मुळे सावलीचा प्रश्न येतच नाही आणि शांतता तर मुळीच नाही कारण खाडी मधून रेती काढणाऱ्या क्रेन चा होणारा आवाज हा सुंदरशी अशी बॅगराउंड म्युसिक देत होता आणि वरून सूर्य आग ओकत होता. मन अशा परिस्थितीत शांतता आणि सावली अशक्यच. त्यातल्या त्यात मी एका बंद क्रेन च्या आडोश्याला बसून आणि काना मध्ये हेडफोन घालून काढलेले हे सुंदर बोटीचे चित्र
18 August 2011
17 August 2011
13 August 2011
बदामी लेणी |
गुफा मंदिर क्र.३ मधील विष्णु ची मूर्ती |
स्तभांवरील नक्षीकाम |
स्तभांवरील नक्षीकाम |
मंदिराच्या गाभाऱ्यातील नक्षीकाम |
स्तंभ |
स्तंभ |
विष्णुमूर्ती |
मूर्तीच्या पायत्याशी असलेले नक्षीकाम |
हे चित्र पूर्ण पने रोजच्या वापरात असलेल्या काळ्या रंगाच्या शाईच्या पेनाने काढले आहे. प्रथम खाली दाखवलेल्या फोटो वर पट्टी ने मार्किग करून योग्य ती मापे घेतली. नंतर cartridge drawing paper वर ज्या साईज चे चित्र काढायचे आहे तेवढी मार्किंग करून पेपर योग्य त्या आकारात कापून घेतला व तो बोर्ड ला फिक्स केला.हा पेपर तुम्हाला बाजारात हव्या त्या साईज मध्ये मिळू शकतो. त्या नंतर पेपर वर पेन्सील च्या साह्याने कच्चे रेखाटन करून घेतले. व कुठे काही चुका नाही आहेत ना याची योग्य ती खात्री करून घेतली कारण एकदा का पेनाने काम करायला सुरावावत केली की कोणते ही बदल चित्रात करता येत नाहीत. त्यामुळे पेनाचे काम करण्या अगोदर रेखाटन बरोबर आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. त्या नंतर पेनाच्या साह्याने स्टीपलिंग तंत्राचा वापर करून चित्र पूर्ण केले.
ह्या पेनाचा वापर करून चित्र पूर्ण केले |
नेट वरून घेण्यात आलेला बदामी लेणी चा फोटो |
बदामी लेणी बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील लिंक वर टिचकी द्या.
Subscribe to:
Posts (Atom)